Nagpur Ashaworker protest : नागपुरात आशासेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन
Continues below advertisement
Nagpur Ashaworker protest : नागपुरात आशासेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन नागपुरात गटप्रवर्तक तसंच आशासेविकांचं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं शासकीय निवास असलेल्या विजयगड बंगल्यासमोर आंदोलन सुरु आहे. तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना आशा सेविकांना ७ हजार रुपये तर गटप्रवर्तकांना १० हजार रुपये मानधन वाढीचं तसंच २ हजार रुपये भाऊबीज देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची पूर्तता करावी, त्या संदर्भातला जीआर काढावा आणि अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे.
Continues below advertisement