Nagpur: नागपुरात 35 वर्षीय महिलेवर अॅसिडसदृशय द्रव्य टाकल्याची घटना, CCTV फुटेज समोर - ABP Majha
Continues below advertisement
नागपुरात 35 वर्षीय महिलेवर अॅसिडसदृशय द्रव्य टाकल्याची घटना घडलीय. नागपुरातील ज्योतीनगर रस्त्यावर घडलेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. सविता जेंगणे असं या महिलेचं नाव आहे. सकाळी ही महिला सायकलवरुन कामावर जात असताना दुचाकीस्वाराने तिच्या चेहऱ्यावर हे अॅसिडसृशय द्रव्य फेकलं. या हल्ल्यामुळे ही महिला सायकलवरुन खाली कोसळली. या हल्ल्यात या महिलेच्या चेहऱ्यावर आणि खांद्यावर जखमा झाल्यात. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेतायत. दरम्यान ही घटना जुन्या वैमनस्यातून घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.
Continues below advertisement