Nagpur Abhishek Singh: अभिषेक सिंहला ओळखत नाही- नितीन राऊत ABP Majha
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचे सुपुत्र कुणाल राऊत हे मोक्कामध्ये फरार असलेल्या एका आरोपीला गेल्या दीड वर्षापासून आश्रय देत असल्याचा आरोप करण्याता आला आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी हा आरोप केला आहे.. अभिषेक सिंह हा आरोपी गेल्या दीड वर्षापासून नागपुरातून फरार आहे.. मात्र, हा आरोपी देशातील अनेक शहरात नितीन राऊतांचे सुपुत्र कुणाल राऊत यांच्यासोबत फिरत असल्याचं ज्वाला धोटेंनी म्हटलंय.. या संदर्भातले काही फोटो आणि पुरावे ज्वाला धोटे यांनी पोलिसांना दिले आहेत.. दरम्यान या संदर्भात नितीन राऊतांना विचारले असता त्यांनी ज्वाला धोटेंचे आरोप फेटाळले आहेत..