Nago Ganar On Prashant Bamb: प्रशांत बंब यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार - गणार
शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात विरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात आता भाजपमधीलच आमदारांनी मोर्चा उघडला आहे. विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजप समर्थित आमदार नागो गाणार यांनी प्रशांत बंब यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी अशी मागणी करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.