NAFED Onion Scam | नाफेड कांदा खरेदीत मोठा घोटाळा, ७०% केंद्रांवर तफावत

नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये मोठ्या घोटाळ्याची शक्यता आहे. अनेक खरेदी केंद्रांकडून नुसती कागदोपत्री खरेदी झाली असून, प्रत्यक्ष कांदा खरेदी आणि कागदोपत्री खरेदी याच्यामध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. नऊ भरारी पथकांनी केंद्रांवरती अचानक जाऊन तपासणी केली असता, सत्तर टक्के संस्थांच्या खरेदी केंद्रांवरती ही तफावत आढळली. औसानं गेलेल्या संस्थांकडूनही कांदा खरेदी केल्याचं निष्पन्न झालं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडची बावीस आणि एनसीसीएफची अठ्ठावीस कांदा खरेदी केंद्र आहेत. राज्यामध्ये नाफेडची पंचवीस तर एनसीसीएफची बत्तीस कांदा खरेदी केंद्र आहेत. राज्यामध्ये दोन लाख सत्तर हजार पैकी सव्वा लाख टन कांदा खरेदी होते. जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, "जवळपास बहुतांश दहा टक्केपासून तीस टक्के पर्यंत फरक आहे. खरेदी केलेल्या मालमध्ये जवळपास सर्व काही संस्था वगळता सत्तर शंभर टक्के संस्थांमध्ये मालाच्या प्रक्रियेमध्ये हा फरक दिसतोय." या प्रकरणी नाफेडला रिपोर्टिंग करण्यात आली असून, नाफेड किंवा एनसीसीएफने पुढील कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola