Covid Vaccine: मेडिकलमध्ये कोरोनावरची लस? DGCI च्या तज्ञ समितीची शिफारस ABP Majha

कोरोनावरील लसीबाबत मोठी बातमी आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशी लवकरच मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तशी शिफारस डीसीजीआयच्या समितीनं केली आहे. औषध महानियंत्रकांच्या परवानगीनंतर या दोन लशी मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. अर्थात या लशींची खुलेआम विक्री करता येणार नाही. तर कोविन पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयं आणि क्लिनिकशी संबंधित मेडिकल स्टोअर्समध्येच या लशी उपलब्ध केल्या जातील. याशिवाय केवळ पात्र नागरिकच ही लस विकत घेऊ शकणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola