Sindhudurg | सिंधुदुर्गात 'माझा वेंगुर्ला उत्सव रानभाज्यांचा' खवय्ये आणि निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

Continues below advertisement

सिंधुदुर्गातील ‘माझा वेंगुर्ला‘ ग्रुपतर्फे ‘उत्सव रानभाज्यांचा‘ हा उपक्रम राबवला जात आहे. रानभाजी आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृती विक्रीकेंद्रामार्फत खवय्यांना व निसर्गप्रेमीना या रानभाज्याची चव चाखता येत आहे. पावसाच्या आगमनासोबत खवय्यांना उत्सुकता असते ती आपल्या कोकणच्या रानावनात उगवणाऱ्या अनेक दुर्मिळ, औषधी आणि रानमोळी चवदार रानभाज्यांची. या अल्पपरिचित रानभाज्यांचे औषधी महत्व, उपयोग आणि त्यापासून बनवता येणाऱ्या चवदार पाककृती यांची माहिती युवा पिढीला होण्यासाठी ‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे साध्या पद्धतीने रानभाज्याचा उत्सव राबविण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram