Sameer Wankhede Father On Hindu - Muslim : मी ज्ञानदेवच...! पण बायको प्रेमाने दाऊद म्हणायची

Continues below advertisement

मुंबई क्रूझ ड्रग्स केस प्रकरणानं सध्या राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणात केल्या जाणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रांमुळे संपूर्ण प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलं आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक याप्रकरणी माध्यमांसमोर अनेक दावे करत आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामाही ट्विटरद्वारे जारी केला आहे. अशातच याप्रकरणी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram