MVA Seat Sharing : महाविकास आघाडीत तिढ्याच्या जागेवर अजून चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच
MVA Seat Sharing : महाविकास आघाडीत तिढ्याच्या जागेवर अजून चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 20 ऑक्टोबर रोजी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 99 नावे आहेत. त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसमध्ये एकूण 54 उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. त्यामुळे या उमेदवारांची पहिली यादी उद्या म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातील काही प्रमुख उमेदवारांच्या नावांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. निश्चित झालेल्या उमेदवारांची नावे नाना पटोले - साकोली विरेंद्र जगताप- धामणगाव यशोमती ठाकूर- तिवसा विजय वडेट्टीवार- ब्रमपुरी अमित झनक- रिसोड नितीन राऊत- उत्तर नागपूर विकास ठाकरे- पश्चिम नागपूर रणजित कांबळे- देवळी (वर्धा) सुभाष धोटे- राजूरा ( चंद्रपूर) डॉ सुनील देशमुख - अमरावती शहर बबलू देशमुख- अचलपूर भाजपाच्या पहिल्या यादीत 99 जणांची नावे कालच भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या उमेदवारी यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राम कदम अशा प्रमुख नेत्यांच्या समावेश होता. भाजपची दुसरी उमेदवारी यादी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या उमेदवारी यादीवर नजर टाकल्यास महायुतीचा जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. त्यानुसार भाजप 158, शिंदे गट 85 आणि अजितदादा गट 45 जागांवर लढण्याची शक्यता आहे.