Sanjay Raut VS Sapkal : संजय राऊतांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षलर्धन सपकाळांची तक्रार

Continues below advertisement
महाविकास आघाडीमध्ये (MVA) मनसेच्या (MNS) संभाव्य समावेशावरून शिवसेना (UBT) आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्या वक्तव्याची तक्रार थेट काँग्रेस हायकमांडकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'नवीन भिडवोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही, महाविकास आघाडीला नाही.' मनसेला मविआमध्ये घेण्यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील असताना, सपकाळ यांच्या विधानामुळे आघाडीत अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. राऊत यांनी केलेल्या या तक्रारीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचीही चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या वाटाघाटींचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत, असेही सपकाळ यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola