Maharashtra Politics: मंत्री कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे BJP मध्ये, Uddhav Thackeray गटाला धक्का

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे बंधू भारत कोकाटे (Bharat Kokate) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला नाशिक जिल्ह्यात धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भारत कोकाटे हे सिन्नर तालुक्यातील सोमठाणेचे सरपंच राहिले असून, त्यांनी २० मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. माणिकराव कोकाटे हे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री असताना, त्यांचे बंधू भाजपमध्ये गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola