MVA Rift : 'Congress ने दगाबाजी केली', राष्ट्रवादी Sharad Pawar गटाचे Pravin Kunte Patil यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये (MVA) मोठी फूट पडण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील (Pravin Kunte Patil) यांनी काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केले आहेत. 'ज्या ज्यावेळेला महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षावरती निवडणूक लढण्याची वेळ येते त्यावेळेला काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे नेते त्या आघाडी धर्माचं पालन करताना दिसत नाहीत,' असा थेट आरोप पाटील यांनी केला आहे. विदर्भामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने मित्रपक्षांशी दगाबाजी केली. काँग्रेस मित्रपक्षांच्या मतदारसंघात परस्पर उमेदवार उभे करते किंवा कार्यकर्त्यांना बंडखोरी करण्यास भाग पाडते, असा दावाही त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर आता नागपूरमध्ये काँग्रेसला वगळून भाजपविरोधी (Anti-BJP) आघाडी स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुढाकार घेत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement