Sanjay Raut : मुंबईचा महापौर मराठी होण्याला प्राधन्यय - राऊत

Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील (MVA) मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे (BJP) नवनाथ बन (Navnath Ban) यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. 'आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनाच प्रधानमंत्री करायचं आहे,' असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसच्या (Congress) स्वबळाच्या भूमिकेवर टीका केली आहे. मुंबईचा महापौर मराठी मातीतला होण्याला प्राधान्य असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. यावर प्रत्युत्तर देताना भाजप नेते नवनाथ बन यांनी, 'संजय राऊत, तुमचा पक्ष म्हणजे काँग्रेसची बेनामी शाखा आहे,' असा घणाघात केला. मुंबईतील मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेणाऱ्या महायुतीसोबतच आहे आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वासही बन यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola