Congress on Thackeray : आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही; भाई जगतापांचा बॉम्ब
Continues below advertisement
महाविकास आघाडीमध्ये (MVA) काँग्रेस (Congress) नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 'मुंबईत राज ठाकरेंच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही (Uddhav Thackeray) काँग्रेस लढणार नाही' असं खळबळजनक वक्तव्य भाई जगताप यांनी केलंय. मुंबई महानगरपालिका (BMC), जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढायला हव्यात, कारण कार्यकर्त्यांची तशी मानसिकता नाही, असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की हा अनेक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सूर आहे, जो पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतही मांडण्यात आला आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील असेही त्यांनी नमूद केले. या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये, विशेषतः शिवसेनेत (UBT) अस्वस्थता पसरली असून, आता काँग्रेस हायकमांड, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement