Man-Animal Conflict: 'तुम्हाला माणसे जगवायची आहेत की बिबटे?', आढळराव पाटलांचा सरकारला संतप्त सवाल

Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जांभूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय भागूबाई जाधव यांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असता, त्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. 'तुम्हाला माणसे जगवायची आहेत की बिबटे जगवायचेत?' असा संतप्त सवाल माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सरकारला विचारला आहे. आठवडाभरातील हा दुसरा बळी असल्यानं नागरिक आक्रमक झाले असून, जोपर्यंत वनमंत्री घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावर तोडगा म्हणून बिबट्यांची नसबंदी (Leopard Sterilization) करणे आणि त्यांना केवळ सोडून न देता त्यांच्यासाठी बिबट निवारण केंद्र (Leopard Rehabilitation Center) उभारणे आवश्यक असल्याचे मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. गेल्या दहा-बारा वर्षांत या परिसरात बिबट्यांची संख्या शंभर-दीडशेवरून थेट बाराशे ते चौदाशेच्या घरात पोहोचल्याने हा मानव-वन्यजीव संघर्ष (Human-Wildlife Conflict) अधिक तीव्र झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola