Voter List Row: 'मतचोर दिसेल तिथेच फटकावा', Raj Thackeray यांचा थेट आदेश, MVA-MNS एकवटले

Continues below advertisement
मुंबईत मतदार यादीतील घोळ आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि मनसेने 'सत्याचा मोर्चा' काढला, ज्यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार एकत्र आले. 'दुबार-तिबार मतदान करणाऱ्याला फोडून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या,' असा थेट आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला. उद्धव ठाकरे यांनी 'सक्षम' अॅपद्वारे बनावट मोबाईल नंबर वापरून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला. तर, 'जागे रहा नाहीतर अॅनाकोंडा येईल,' असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या संगमनेर मतदारसंघात ९,५०० बोगस मतदार असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे, सत्ताधारी महायुतीचे नेतेही मतदार याद्या सदोष असल्याचे मान्य करत असल्याने, सदोष याद्यांवरून निवडणुका घेण्यास निवडणूक आयोगाला एवढी घाई का आहे, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola