Protest Politics: 'जो बोलतो 'झुकेगा नाही', त्यालाच घेऊन जाणार', यमराजाच्या वेशातील आंदोलकाचा इशारा
Continues below advertisement
एका मोर्चामध्ये यमराजाच्या वेशात सहभागी झालेल्या आंदोलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दुबार-तिबार मतदान करणाऱ्यांना आणि लोकांवर अन्याय करणाऱ्या मंत्र्यांना घेऊन जाण्यासाठी पृथ्वीवर आल्याचे या कार्यकर्त्याने म्हटले आहे. ‘ते बोलतात ना हा झुकेगा नाही, आता त्यालाच घेऊन जातो पहिलं मी,’ असा थेट इशारा या यमराज वेशातील कार्यकर्त्याने दिला. 'शंभर सतरा, शंभर चोवीस, नव्वद, ऐंशी वर्षांचे लोक मतदान करतात, त्यांना मी घेऊन जाणार,' असे म्हणत या कार्यकर्त्याने बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला. लोकांवर अत्याचार होत असून, चुकीच्या निर्णयांमुळे लहान मुलांचे मृत्यू होत असल्याचा आरोपही त्याने केला. आपल्याकडे सर्वांची यादी तयार असल्याचेही या कार्यकर्त्याने म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement