Satya Cha Morcha: राज ठाकरे मोर्चात काँग्रेसचं तळ्यात मळ्यात? Special Report

Continues below advertisement
महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांनी मुंबईत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काढलेल्या 'सत्याचा मोर्चा'मध्ये (Satya Cha Morcha) काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. व्यासपीठावर शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोधी एकजुटीचे प्रदर्शन केले असतानाच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड मात्र गैरहजर राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. भाजपाने यावर टीका करताना म्हटले की, 'कदाचित त्यांना राज ठाकरेंच्या फ्रेममध्ये यायचं नसेल'. याउलट, पक्षात कोणतेही पद नसलेले बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे नेते मोर्चात सहभागी झाले होते. बिहार निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांच्यासोबत एकाच मंचावर दिसल्यास बिहारी मतदारांवर परिणाम होऊ शकतो, या भीतीने काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे. राहुल गांधींनी मतदार यादीचा मुद्दा उचलूनही काँग्रेसला या मोर्चात मोठी संधी साधता आली नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola