Pune Gang War: पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकलं, रिक्षाचालकाची गोळ्या झाडून मारलं

Continues below advertisement
पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसरात आंदेकर (Andekar) आणि कोमकर (Komkar) टोळीयुद्धातून पुन्हा एकदा एका हत्येने खळबळ उडाली आहे. या घटनेत गणेश काळे या रिक्षाचालकाची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. 'पुणे पोलीस पुण्यातील टोळी युद्ध रोखण्यात अपयशी ठरलेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय,' अशी संतप्त प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत आहे. हत्या झालेला गणेश काळे हा आंदेकर टोळीचा सदस्य असलेल्या आणि सध्या तुरुंगात असलेल्या समीर काळे याचा भाऊ आहे. त्यामुळे वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात आयुष कोमकरची हत्या झाली होती, ज्याचा आरोप आंदेकर टोळीवर आहे. दरम्यान, मुंबईतील पवई (Powai) येथे मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. त्याच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola