Uddhav Thackeray On Vote SCam : मतचोरीविरोधात कोर्टात न्याय मागणार : उद्धव ठाकरे
Continues below advertisement
मुंबईत महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांनी मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावरून 'सत्याचा मोर्चा' काढला, ज्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार हे प्रमुख नेते सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांनी, 'माझ्यासकट माझ्या कुटुंबातील चार जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का?' असा सवाल करत गंभीर आरोप केले आहेत. सक्षम ॲपवरून खोट्या नंबरद्वारे आपल्या नावाची पडताळणी करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, ज्या मतदार यादीवर MVA चे ३१ खासदार निवडून आले तीच यादी आता पराभवाच्या भीतीने खराब वाटत आहे. उद्धव ठाकरे यांनी मतदारांना आपली नावे तपासण्याचे आवाहन केले आणि ‘जागे राहा नाहीतर Anaconda येईल’ असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लगावला. या ठिणगीचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement