Voter List : 'जोगेश्वरीमध्ये मतदार याद्या भलत्याच भाषेत, संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप
Continues below advertisement
महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि शेकापचे जयंत पाटील हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेणार आहेत. 'जोगेश्वरीमध्ये कोणत्यातरी अगम्य भाषेत नावं लिहिली आहेत,' असा गंभीर आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, मतदार याद्यांमधील घोळ दूर करावा आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास दृढ व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवत, लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने हे सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement