High Court On Pothole Menace: खड्डे किंवा मॅनहोलमुळे मृत्यू? ६ लाखांची भरपाई द्या: हायकोर्ट

Continues below advertisement
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 'चांगले रस्ते मिळणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचं' कोर्टानं स्पष्ट नमूद केलं आहे. या निकालात, खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात मृत्यू झाल्यास मृताच्या वारसांना सहा लाख रुपये, तर जखमींना पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही नुकसान भरपाईची रक्कम दोन महिन्यांच्या आत वितरीत करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. जर वेळेत भरपाई दिली नाही, तर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाईल, असा सक्त इशाराही न्यायालयाने दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola