MNS on Voter List: भ्रष्टाचार वाढला, दुबार मतदारांची यादी निवडणुक आयोगाकडे देणार

Continues below advertisement
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुती सरकारविरोधात एक मोठी आघाडी उभी राहत आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडी, मनसे आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले आहेत. 'अख्ख्या महाराष्ट्राचं दिवाळं निघालेलंय,' असा घणाघाती आरोप करत विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे. नाशिक महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, रस्त्यांची दुर्दशा, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता एकवटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील कायदेशीर घरं आणि दुकानं पाडल्याचा मुद्दाही उचलण्यात आला आहे. यासोबतच, मतदार याद्यांमध्ये प्रचंड दोष असून त्या 100% दुरुस्त करण्याची आणि निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास निवडणूक आयोगाला 'एक्सपोज' करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola