Mumbai Satyacha Morcha : मविआचा निवडणूक आयोगाविरोधात 'सत्याचा मोर्चा'
Continues below advertisement
मुंबईत मतदार यादीतील (Voter List) गोंधळाविरोधात महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांनी 'सत्याचा मोर्चा' काढला आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले. 'निवडणूक आयोगानं आता आपला बोर्ड काढावा आणि भारतीय जनता पार्टीची (BJP) एक शाखा म्हणून बोर्ड लावावा,' असा थेट हल्लाबोल मोर्च्यातील नेत्यांनी केला आहे. सत्ताधारी पक्ष निवडणूक आयोगाच्या पाठिंब्याने मतदार याद्यांमधून 'व्होट चोरी' करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही 'मूक मोर्चा' काढून निषेध नोंदवला. जर निवडणूक आयोगाने याद्यांमधील चुका दुरुस्त केल्या नाहीत, तर राज्यात मोठा उद्रेक होईल, असा इशारा शिवसेना (UBT) नेते विनायक राऊत यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement