Maharashtra Politics: मविआ-मनसे एकत्र, स्थानिक स्वराज्यासाठी Nashik मध्ये पत्रकार परिषद
Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. एकीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देत असताना, नाशिकमध्ये होणारी ही संयुक्त पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या परिषदेत मविआचे घटक पक्ष आणि मनसेसोबत इतर समविचारी पक्षही सहभागी होणार आहेत. या घडामोडींमुळे नाशिकमधील स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे भाजपनेही (BJP) या निवडणुकांसाठी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement