Maharashtra Politics : ‘जिथे आमदार तिथे स्वबळावर’, शिंदे सेनेची घोषणा, BJP ची एकला चलो रे ची तयारी?
Continues below advertisement
मराठवाडा (Marathwada) विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा (BJP), शिंदे गट (Shinde Sena) आणि महाविकास आघाडीतील (MVA) समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत. शिंदे सेनेने 'जिथं ज्यांचा आमदार ती नगरपंचायत स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतला आहे', अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), बीड (Beed), नांदेड (Nanded) आणि हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी महायुतीमध्येच थेट लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे शिंदे गटाने वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आणि पैठणमध्ये स्वतंत्र उमेदवार देण्याचे ठरवले आहे, तर दुसरीकडे नांदेडमध्ये भाजपाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याचे संकेत आहेत, तर परळीत राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये चुरस आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून मराठवाड्यातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement