MVA-MNS Action : निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांची एकजूट, रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Continues below advertisement
महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि मनसे (MNS) निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात आक्रमक झाले असून, लवकरच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पुढील रणनीती जाहीर करणार आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी इशारा दिला आहे की, 'निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल'. यापूर्वी, संजय राऊत (Sanjay Raut) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची दोन वेळा भेट घेतली होती. सत्ताधारी आणि निवडणूक आयोगात साटेलोट असल्याचा आरोप करत, त्यासंबंधीचे पुरावे सादर करूनही आयोग ऐकत नसल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार विरोधकांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola