EC Under Fire: 'निवडणूक आयोग ऐकत नसेल तर रस्त्यावर उतरून दणका देऊ', संजय राऊत यांचा थेट इशारा

Continues below advertisement
मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा उचलून धरला आहे. त्याचवेळी, निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले असून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेची माहिती दिली. 'निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल, अशाप्रकारचे एकमत सर्वपक्षीय नेत्यांमध्ये होत आहे', असा स्पष्ट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. मनसेसह महाविकास आघाडीने मतदार यादीतील त्रुटींसंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर होणाऱ्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाविरोधात पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola