Voter List Row: 'मतदार याद्यांबाबत गुप्तता का?', MVA-MNS चा निवडणूक आयोगाला थेट सवाल
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि मनसे (MNS) यांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली आहे. 'मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदानाबाबत गुप्तता का बाळगली जात आहे?', असा थेट सवाल विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला केला आहे. काल, महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार याद्यांमधील त्रुटी, दुबार नावे आणि वगळण्यात आलेल्या नावांचा तपशील जाहीर करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Elections) VVPAT मशीन वापरण्याची मागणीही त्यांनी केली. या तक्रारींवर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोगामध्ये संयुक्त बैठक होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement