Gadchiroli Surrender: भूपतीसह 60 माओवाद्यांचं आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Continues below advertisement
गडचिरोली पोलीस मुख्यालयात (Gadchiroli Police Headquarters) आज एक मोठी घडामोड घडली आहे, जिथे माओवाद्यांचे पॉलिटब्युरो आणि सेंट्रल कमिटी सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल राव (Mallojula Venugopal Rao) यांनी तब्बल ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले आहे. मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी भूमिका मांडली की, 'सशस्त्र माओवाद्याचा मार्ग सोडला पाहिजे आणि सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहामध्ये माओवाद्यांनी आलं पाहिजे'. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः उपस्थित राहणार आहेत. सोनू उर्फ भूपतीने दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात दहा डीवीसीएम (DVCM) आणि इतर कमांडर्ससोबत शस्त्रे खाली ठेवून पोलिसांना शरण आले. या सामूहिक शरणागतीमुळे महाराष्ट्रातील सशस्त्र माओवादावर मोठा परिणाम होणार असून, राज्यातून सशस्त्र माओवाद लवकरच पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement