Maharashtra Winter Session 2022 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात मविआचा अविश्वास प्रस्ताव
बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधातील अविश्वास प्रस्तावाची.. महाविकास आमदारांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय... अविश्वास प्रस्ताव विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे सोपवण्यात आलं... या पत्रावर महाविकास आघाडीच्या ३९ जणांच्या सह्या आहेत... पण या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नसल्याची माहिती मिळतेय... विधानसभाध्यक्ष पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप मविआच्या नेत्यांनी केलाय.. आणि त्यानुसार विधीमंडळ सचिवांकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्र दिलं..