Supriya Sule Mutton Controversy | मटण खाण्यावरून वाद पेटला, सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर!

Continues below advertisement
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शहरांमध्ये मांसविक्री बंद ठेवण्याच्या काही पालिकांच्या आदेशावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद शांत होत नाही तोच आता मटणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिंडोरीच्या खेडगाव येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी "मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे?" असे वक्तव्य केले. आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, कुणाचं निंदेनाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. "सुळेंच्या वक्तव्याला वारकरी उत्तर देतील, मी देणार नाही," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, त्या रामकृष्ण हरिवाली आहेत आणि खोटं बोलत नाहीत. "खाल्लं माझ्या पांडुरंगालाच चालतंय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवारा खातो आणि आमच्या पैसांनी खातो बाबा. दुसर्‍यांचं काही नाही," असेही त्यांनी नमूद केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा सांगितले की, "याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील."
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola