BMC School Privatization : मुंबई मनपाच्या शाळांच्या खासगीकरणाचा वाद पेटला, वर्षा गायकवाड आक्रमक
मुंबईतील मालाड मालवणी परिसरातील टाऊनशिप शाळेच्या खासगीकरणावरून नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेसने या खासगीकरणाला तीव्र विरोध करत शाळेबाहेर आंदोलन केले. वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले, यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, काँग्रेसचा विरोध सुरू असतानाच मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत शाळेत बैठक सुरू होती. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे खासगीकरण थांबवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. एका आंदोलनकर्त्याने म्हटले की, "लोढासाहेब स्कूल को बेचते चाहते. म्युनिसिपालिटी की स्कूल है गरीब बच्चों की स्कूल है, ये प्रायवेट करणा चाहते हैं, यह अपने चमचे को देना चाहते हैं." मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी खासगीकरणाचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या तीस ते पस्तीस शाळा संस्थांना चालवायला दिल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या जीआर अंतर्गत, ज्या संस्था स्वखर्चावर शाळा चालवण्यासाठी पुढे येतील, त्यांना शाळा देण्यात याव्यात असा निर्णय होता.