Jalgaon Murder | जळगावात चार अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या
चार अल्पवयीन बालकांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात घडली आहे. बोरखेडा शेत शिवारात भिलाला नावाचं सालं दारी करणार कुटुंब राहतं. दोन मुलं आणि दोन मुली असलेली चार भावंड घरी ठेऊन भिलाला दाम्पत्य गावाला गेले असता, रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने या चारही जणांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केली.