Mundhwa Land Scam: कंपनीत 99% भागीदारी, तरी Parth Pawar यांच्यावर गुन्हा का नाही? विरोधकांचा सवाल
Continues below advertisement
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा (Mundhwa Land Scam) प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात अनियमितता आढळल्यास कोणीही दोषी असला तरी कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे. 'या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल, माझ्या या मताशी उपमुख्यमंत्री अजित दादा पवारही सहमत असतील,' असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पुण्यातील वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला २१ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरावा लागेल, अशी अट सहदुय्यम निबंधकांनी घातली आहे. या प्रकरणात ९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र कंपनीत ९९ टक्के भागीदारी असूनही पार्थ पवारांचे नाव एफआयआरमध्ये नसल्याने विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जे रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सह्यांसाठी हजर होते, त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे, तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याला दुजोरा दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement