Vote Theft Row: 'मतं कशी चोरली जातात?'; राहुल गांधींच्या आरोपानंतर मुंबई युथ काँग्रेस आक्रमक
Continues below advertisement
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'वोट चोरी'चे (Vote Theft) आरोप केल्यानंतर आता मुंबई युथ काँग्रेस (Mumbai Youth Congress) आक्रमक झाले आहे. 'लोकल आणि मेट्रोतील प्रवाशांना पत्रक देऊन मतं कशी चोरली जातात', याचा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते लोकल आणि मेट्रोमध्ये पत्रके वाटून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, 'वोट चोरी' आंदोलनात सहभागी होण्यासाठी काँग्रेसने जनतेला आवाहन केले आहे. हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवून पक्षासाठी पाठिंबा मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement