SSC EXAMS : दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

दहावीच्या परीक्षांसाठी राज्य सरकारनं आता गाईडलाइन्स ठरवल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामध्ये लेखी मूल्यमापनाला 30 गुण असतील. गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक याआधारावर 20 गुण दिले जातील. तर नववीच्या अंतर्गत मूल्यमापनावर 50 गुण अवलंबून असतील. म्हणजेच, जे विद्यार्थी कोविड पूर्व काळात नववीत होते, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नववीच्या निकालावर 50 गुण दिले जातील. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola