Mumbai Superfast News: मुंबई सुपरफास्ट न्यूज : 5 सप्टेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Mumbai Superfast News: मुंबई सुपरफास्ट न्यूज : 5 सप्टेंबर 2024 : ABP Majha
अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी यंदाही ड्रेसकोड, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती, ड्रेसकोडवरून यंदाही वादाची शक्यता
मरोळमधील कदम वाडीच्या महाराजाचं आगमन. गोविंद पथक यांचा सलामीत महिलांच्या सुरक्षेचा संदेश.  बाप्पाच्या आगमन सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि  मंत्री दिपक केसरकर उपस्थित.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत  १ कोटी ६० लाख महिलांना ४ हजार ७८७ कोटींचे वाटप, महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती.
लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय , सामान्य़ कुटुंबांना दिलासा.
अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय,  ३६ हजारांपेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार. 
राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्तीवेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार, मुख्यमंत्री शिंदेंची संघटनांच्या बैठकीत घोषणा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram