मुंबई- सिंधुदुर्ग विमानसेवेचं वेळापत्रक ठरलं! 9 ऑक्टोबरपासून नियमित सेवा
Continues below advertisement
जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळावरुन येत्या 9 ऑक्टोबरपासून नियमित मुंबई ते सिंधुदुर्ग असा विमान प्रवास सुरु होणार आहे. कोकणात मोठ्या संख्येनं देश विदेशातील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कोकणात येत असतात. त्यांना आता मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास काही तासात करता येणार आहे. तर सण समारंभाचा आनंद लुटण्यासाठी कोकणवासीयांना सुध्दा कोणत्याही खड्ड्याविना अवघ्या काही तासांत घरी जाता येणार आहे. त्यासाठी अलायन्स एअर या विमान कंपनीने मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे वेळापत्रक आणि तिकीटदर घोषित केले आहेत. ही कंपनी 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी नियमित विमानसेवा चालवणार आहे.
Continues below advertisement