Mumbai : पोलादपूरमध्ये शिवसेनेचे 10 नगरसेवक विजयी, नगरसेवकांकडून एकनाथ शिंदेची भेट : ABP Majha
महाराष्ट्रमधील नगरपंचायत निवडणूकांचे निकाल लागले आहेत. पोलादपूरमध्ये शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व निवडणूक आलेल्या उमेदवारांनी युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पोलादपूर या ठिकाणी एकूण १७ जागा होत्या त्यापैकी शिवसेना १० काँग्रेस ६ आणि भाजपला १ जागा मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांनी सगळ्या विजयी उमेदवारांची भेट घेऊन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.