Shirdi Sai Baba : द्वारकामाईचं दक्षिण दिशेचं द्वार आजपासून भाविकांसाठी खुलं : ABP Majha
कोरोना संकटानंतर शिर्डीत तब्बल 22 महिन्यांनंतर द्वारकामाईचं दक्षिण दिशेचं द्वार आजपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. 17 मार्च २०२० पासून द्वारकामाईचं द्वार साईभक्तांसाठी बंद करण्यात आलं होतं. 16 नोव्हेंबर 2020 ला साईमंदिर भाविकांसाठी निर्बंधांसह खुलं करण्यात आलं. पण द्वारकामाईचं दक्षिणद्वार मात्र बंदच ठेवण्यात आलं होतं. द्वारकामाईमध्ये 60 वर्षे साईबाबांचं वास्तव्य होतं. साईबाबांनी सुरु केलेली धुणी आजही तिथं अविरत सुरू आहे.