India Pakistan Asia Cup Row | 'गरम सिंदूर'चं कोल्डड्रिंक झालं? ठाकरेसेनेचा 'Operation Sindoor'वरून हल्लाबोल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप क्रिकेट मॅचवरून सध्या राजकारण तापले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने या मॅचला तीव्र विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शहांच्या मुलाच्या फायद्यासाठी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले जात असल्याचा आरोप केला. "जैशसाठी? कोण आहे जैश? त्या तिकडे जो धारातीर्थी पडलेला आपला सैनिक किंवा ते जे काही आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा हा मोठा आहेस. त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे," असा सवाल उपस्थित करण्यात आला. खेळ आणि राजकारण एकत्र येऊ शकत नाही, तर खून आणि क्रिकेट कसे एकत्र येऊ शकते, असेही विचारण्यात आले. पहलगाममधील घटनेनंतर संरक्षण मंत्र्यांनी "ऑपरेशन सिंदूर अब तक रुका नहीं है, वो चालू ही रहेगा" असे म्हटले होते. तर पंतप्रधानांनी "खून और पानी एक साथ बह नहीं सकता" असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर, "आनंद की गोष्ट है, मेरे रगों-रगों में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है" या विधानाचा संदर्भ देत, "मग त्या गरम सिंदूर चं काय आता कोल्डड्रिंक झालं?" असा उपरोधिक प्रश्न विचारण्यात आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola