Mumbai School : मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय : ABP Majha


कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय अकरावीचे वर्गही 31  जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत. या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नाताळच्या सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू झाल्या होत्या. पण कोरोना  आणि ओमिक्रॉन प्रसारामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola