Sanjay Raut | चलो अयोद्धा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला रामलालाचं दर्शन घेणार | ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या सात मार्च रोजी पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, याबाबतची माहिती शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसपूर्तीला उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार होते, पण उद्धव ठाकरे आता सात मार्च अयोध्येला जाणार आहेत अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.