पोलिस अधिकारी सचिन वाझेंची एटीएसकडून आज चौकशी होण्याची शक्यता
Continues below advertisement
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केलं. तसंच त्यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशयही विरोधकांनी व्यक्त केला. परंतु सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालत आहे. वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वी मनसुख यांचा मृतदेह कळवा खाडीत मिळून आला. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या स्टेटमेंटनुसार एटीएसनं अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणाचाही गुन्हा दाखल केला आहे.
Continues below advertisement