Coronavirus | जळगाव शहरात शुक्रवार, शनिवार, रविवारी जनता कर्फ्यू
Continues below advertisement
जिल्ह्यासह शहरात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार अशा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या तीन दिवसात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठ बंद राहणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील जनतेने जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह प्रशासनाने केले आहे.
Continues below advertisement