Mumbai Hawker Andheri पादचारी पूल अखेर फेरीवाला मुक्त, पोलिसांची मोठी कारवाई

Continues below advertisement
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मुख्य पादचारी पूल अखेर अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यात आला आहे. फेरीवाल्यांकडून पुलावर होणारी गर्दी, मुलींचा विनयभंग, छेडछाड आणि हाणामारीच्या वाढत्या प्रकारांसंबंधात सातत्याने तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या तक्रारींची दखल घेत अंधेरी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश माचिंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुलावरील सर्व अनधिकृत फेरीवाले हटवले. या कारवाईमुळे हा मुंबईतील पहिला रेल्वे पादचारी पूल आहे जो पूर्णपणे फेरीवाला मुक्त झाला आहे. फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर जागा व्यापल्याने सर्वसामान्यांना चालण्यासाठी अत्यंत अरुंद जागा उरली होती. आता पूल मोकळा झाल्याने आणि पोलिसांनी गस्त वाढवल्याने पादचारी आणि विशेषतः महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola