Ajit Pawar : 'माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम करू नका'; पवारांचा नातेवाईक, कार्यकर्त्यांना इशारा
Continues below advertisement
जळगावातील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी बारामती आणि माळेगाव नगरपालिका निवडणुका तसेच जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर सविस्तर भूमिका मांडली. 'माझ्या नावाचा वापर करून माझे जवळचे नातेवाईक असतील, कार्यकर्ते असतील किंवा अधिकारी असतील, त्यांनी जरी कुणी काही सांगितलं आणि ते नियमात नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांनी ते काम अजिबात करता कामा नये,' असा स्पष्ट इशारा अजित पवारांनी दिला. बारामती खरेदी-विक्री संघाच्या जमीन व्यवहारावर बोलताना, त्यांनी १९९४ पासूनचा घटनाक्रम सांगितला आणि या प्रकरणात कोणतीही अनियमितता नसल्याचा दावा केला. तसेच, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली असून, महिनाभरात सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले. निवडणुकांच्या तोंडावर मतांची विभागणी टाळण्यासाठी महायुती म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न असेल, पण स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement