Mumbai's AQI: मुंबईची हवा पुन्हा 'अतिशय खराब', शिवडीचा निर्देशांक २५० पार, आरोग्याचा धोका वाढला
Continues below advertisement
मुंबईतील (Mumbai) हवेची गुणवत्ता (Air Quality) पुन्हा एकदा घसरली असून, शहरातील अनेक भागांमध्ये प्रदूषण 'मध्यम' ते 'अतिशय खराब' श्रेणीत पोहोचले आहे. 'समीर' ॲपवरील रविवारच्या आकडेवारीनुसार, शिवडी (Sewri) आणि देवनार (Deonar) परिसर प्रदूषणाचे केंद्र बनले आहेत. 'शिवडी परिसरातील हवा 'अतिशय खराब' या श्रेणीत वर्गीकृत झाली असून, तिथे दीर्घकाळ बाहेर राहणाऱ्या नागरिकांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू शकतो,' असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. शिवडीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) तब्बल २५० नोंदवला गेला, तर देवनारमध्ये तो १७८ वर पोहोचला आहे. याव्यतिरिक्त, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (१६१), मालाड (१६१) आणि घाटकोपर (१५५) यांसारख्या ठिकाणीही हवेची गुणवत्ता 'खराब' नोंदवण्यात आली. याउलट, कुलाबा (Colaba) परिसरातील हवा ४५ AQI सह सर्वात स्वच्छ राहिली. ऑक्टोबर महिन्यात पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती, मात्र आता पुन्हा प्रदूषण वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement