Ajit Pawar On Jay Pawar : जय पवारांच्या उमेदवारीवर अजित पवारांचा पूर्णविराम

Continues below advertisement
बारामती (Baramati) नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे पुत्र जय पवार (Jay Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती, मात्र या चर्चांना स्वतः अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे. 'मी पण ती चर्चा ऐकली, मला आजपर्यंत बरेच जणं म्हणाले परंतु तसं काही होणार नाही,' असे स्पष्ट विधान करत अजित पवारांनी जय पवार निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. या घोषणेनंतर, अजित पवारांचे दुसरे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याशी संबंधित जमीन प्रकरणाच्या वादामुळेच जय पवारांची उमेदवारी मागे घेण्यात आली की काय, अशी नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबातील राजकीय वारसा कोण चालवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, अजित पवारांच्या या निर्णयामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola